राहाता बाजार समितीती ‘या’ दिवशी कांदा लिलाव बंद राहणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  सोमवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 7 हजार 359 गोण्यांची राहाता बाजार समितीत आवक झाली. उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 3800 तर लाल कांद्याला 3200 रुपये इतका भाव मिळाला.(Rahata Bazar Samiti)

तसेच येत्या रविवारी दि. 2 जानेवारीपासून कांदा लिलाव आता रविवार ते शुक्रवार राहील. फक्त शनिवार कांदा लिलाव बंद असेल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर व उपसभापती बाळासाहेब जपे यांनी दिली. जाणून घ्या कांद्याला मिळालेला दर

उन्हाळी कांदा नंबर 1 ला 3200 ते 3800 रुपये भाव मिळाला

लाल कांद्याला 2700 ते 3200 असा भाव मिळाला

कांदा उन्हाळी नंबर 2 ला 2350 ते 3150 रुपये भाव मिळाला

लाल कांद्याला 1750 ते 2650 रुपये भाव मिळाला

कांदा नंबर 3 ला उन्हाळी 1200 ते 2300 रुपये भाव मिळाला

लाल कांद्याला 700 ते 1700 रुपये भाव मिळाला गोल्टी

उन्हाळी कांद्याला 2500 ते 2700 रुपये भाव मिळाला

लाल कांद्याला 2100 ते 2300 रुपये भाव मिळाला

जोड कांद्याला उन्हाळी 200 ते 1100 रुपये भाव मिळाला

लाल कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe