अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी येस्टीऊ कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.(Adv. Anil Parab)
दरम्यान संप मागे घ्यावा यासाठी शासनांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. नुकतेच कामावर परत येण्याचे वारंवार आवाहन करूनही अनेक एसटीचे कर्मचारी कामावर परतले नाहीत.
त्यामुळे जे कर्मचारी बडतर्फ झाले आहेत त्यांना कामावर घेता येणार नाही. अशी माहिती परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली. यावेळी बोलताना मंत्री परब म्हणाले, संपापूर्वी कृती समितीसोबत बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले गेले होते, तरी संप सुरू राहिला. यामध्ये विलीनीकरणाचा मुद्दा लावून धरण्यात आला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नेमलेली ही समिती कामगार, युनियनसह सर्व बाजू ऐकून घेऊन शासनास अहवाल सादर करणार आहे.
राज्य शासनाने एसटी कर्मचार्यांच्या पगारात वाढ केली आहे. हा पगार दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत नियमित जमा होईल याची हमी सुद्धा राज्य शासनाने घेतली आहे,
कामावर परत येण्याचे वारंवार आवाहन करूनही अनेक कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यांच्यावर केलेल्या निलंबनाची कार्यवाही मागे घेण्याचे आश्वासन देऊनही कामावर परतले नव्हते. त्यामुळे जे कर्मचारी बडतर्फ झाले आहेत त्यांना कामावर घेता येणार नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम