अरे बापरे! ‘त्या’ विद्यालयातील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या परत वाढली

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात काल पुन्हा ९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळले. त्यामुळे आता नवोदय विद्यालयातील एकुण कोरोना बाधितांची संख्या ९२ वर पोहोचली आहे.(Ahmednagar Corona news)

टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय हे निवासी विद्यालय असुन, मागील आठवड्यात शुक्रवारी ९ कोरोनाबाधित आढळून आले होते. तर शनिवारी १० कोरोनाबाधित विद्यार्थी व शिक्षक आढळून आले आहे.

तर रविवारी सकाळी ३३ व सायंकाळी १९ कोरोना बाधित आढळून आले तसेच सोमवारी सायंकाळी १२ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले आहे.

आज मंगळवारी सायंकाळी अजून ९ कोरोना बाधीत आढळले.सर्व कोरोना बाधीत विद्यार्थ्यांवर पारनेर ग्रामीण रूग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

विद्यालयातील जवळपास सर्वच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तपासणी पुर्ण झाल्या आहेत . त्यामुळे आज केवळ २ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

नवोदय विद्यालय प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याने प्रवेशासाठी पुर्णपणे बंदी घातली आहे.कोरोना बाधितांचा आकडा रोजच वाढत असल्याने पालकांची चिंता वाढलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe