अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- संतोष परब हल्लाप्रकरणावरून शिवसेनेने भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. यातच नितेश राणे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही.(Nitesh Rane)
तब्बल साडेतीन तासाच्या सुनावणीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे. कोर्टाची वेळ संपल्यामुळे ही सुनावणी उद्यावर ठेवण्यात आली आहे.

त्यामुळे नितेश राणे यांना जेल की बेल याचा उद्या फैसला होणार आहे. नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे तर आमदार नितेश राणे व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत यांना पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केल्यानंतर अटकेच्या भीतीने जिल्हा व सत्र न्यायालयात दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
त्याच्यावर आज युक्तिवाद झाला. उद्या पुन्हा एकदा युक्तिवाद होईल असे सरकारी अँड प्रदीप घरत यांनी म्हटले आहे.
आमदार नितेश राणे यांच्यासाठी अँड. संग्राम देसाई तर संदेश सावंत यांच्यासाठी अँड. राजेंद्र रावराणे आणि सरकार पक्षातर्फे अँड प्रदीप भरत व अँड भूषण साळवी यांनी न्यायालय मध्ये उपस्थित राहून युक्तिवाद केला.
आज अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय होत नसल्याने अँड देसाई यांनी आमदार नितेश राणे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून न्यायालयात विनंती केली पण न्यायालयाने नकार दिला. मात्र उद्या युक्तिवादानंतर सुनावणी होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम