अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- उपनगर भागातील नुकत्याच श्रीमंता घरच्या लाडक्या पोराने फरारी घेतली ती घेऊन मित्रांसमवेत लॉंग ड्राईव्हला निघाला निघत असताना मद्यधुंद अवस्थेत या तरुणाने बालिकाश्रम रोड वर रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना धडक दिली या धडकेमध्ये दहा ते बारा वाहनांचे नुकसान झाले.(Breaking news)
याबाबत अधिक माहिती अशी कि, बालिकाश्रम रोड सतत गजबजलेला असतो . आणि याच वर्दळीच्या रोडवर या बडे बाप कि बिघडी औलादने धुमाकूळ घातला होता.
दरम्यान या अपघातात सुदैवाने काही जीवित हानी घडली नाही. दरम्यान चोप देण्याच्या आतच श्रीमंत घरच्या बापाचे पोरगं आपली चारचाकी लाल रंगाची फरारी घेऊन पसार झाला आहे.
नुकसान झालेल्या वाहन चालकांनी थेट पोलिस ठाणे गाठले या श्रीमंत बापाच्या पोरावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे आता लक्ष लागून आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम