अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- राज्यात आज दिवसभरात राज्यात पाच हजारांपेक्षाही जास्त नवीन करोना रूग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकारने सावधगिरीच्या दृष्टीने निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.(Health minister Rajesh Tope)
या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. या बैठकीत कोरोना निर्बंधांसह, संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

तसंच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे. आज टास्क फोर्स सोबत बैठक झाली आहे. या सगळ्या संदर्भात खूप सविस्तर चर्चा झालेली आहे.
या संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. तो आज उद्यामध्येच घ्यावा लागेल. त्या संदर्भात जी चर्चेतील मुद्दे आहेत, त्या मुद्य्यांवरून तो निर्णय घेतल्या जाण्याच्या दृष्टीकोनातू कार्यवाही होईल.
” याचबरोबर, “हे नक्कीच आहे की कुठेही ज्या ठिकाणी हॉल्स आहेत, गर्दी आहे त्या ठिकाणी गर्दी टाळलीच पाहिजे आणि गर्दी नकोच हाच एक सूर सर्वसाधरणपणे आहे.
तो नको कारण त्यामुळेच संक्रमण अधिक झपाट्याने वाढले हे सर्वसाधरणपणे सर्वांचं मत आहे आणि त्या दृष्टीकोनातून योग्य तो निर्णय घेण्याचा निर्णय होऊ शकेल.
नागरिकांना आवाहन… 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो.
असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असं आवाहनही टोपे यांनी यावेळी केलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम