अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- अहमदनगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांनी गुरुवारी (दि.३०) पदभार स्वीकारला आहे.दरम्यान अहमदनगर शहराचे तत्कालीन शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांची बदली झाली.(Ahmednagar Police)
यानंतर त्या रिक्त जागी नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके या दोन्ही अधिकारी यांनी प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले गेले..

file photo
परंतु आता अहमदनगर शहरातील कायदा सुव्यवस्थेसाठी पूर्ण वेळ शहर उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कातकाडे यांनी पदभार स्वीकारला आहे.
पण नगर शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिस ठाणे परिसरातील अवैध धंद्यांसह वाढत्या गुन्हेगारीवर करडी नजर कातकाडे यांना ठेवावी लागेल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम