अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील एका गावातील एका अठरा वर्षाच्या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूमुळे तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला.(crime news)
याबाबत परिसरातील नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहे. मागील दोन दिवसांपूर्वी एका अठरा वर्षाच्या मुलीने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे.
मात्र या मुलीने थेट आपले जीवन संपवण्याचा मार्ग का निवडला,का तिला हे कृत्य करण्यास कोणी भाग पाडले. या घटनेचे मुख्य कारण काय?
याचा पूर्ण उलगडा होणे आवश्यक आहे. ही बाब या तरुणीच्या पीएम रिपोर्ट पोलिसांच्या हातात पडल्यानंतरच समोर येणार आहे.
भरदिवसा एका शेतकरी कुटुंबातील तरुणीला आपले जीवन संपवण्याची वेळ आल्याने तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे व संपूर्ण सत्य समाजापुढे आले पाहिजे अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम