अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- नगर-मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीपुलाजवळ सफरचंदाचा ट्रक पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा दोन्हीही बाजूने चक्काजाम झाला आहे.(Ahmednagar Breaking)
दुपारी उशीरापर्यंत हि वाहतूक सुरळीत न झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान दोन्हीही बाजूने सुमारे पाच किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आज शुक्रवार सकाळी राहुरीकडून नगरच्या दिशेने चाललेला सफरचंदाचा ट्रक राहुरी खुर्द येथील मुळा नदीच्या पुलाजवळ रस्ता दूभाजकावर आदळुन हा ट्रक पलटी झाला.
त्यामधे ट्रकचे व सफरचंदाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महामार्गावर मोठ्या प्रमाणात सफरचंदाचा सडा पडला.अनेक नागरीकांनी सफरचंदावर ताव मारला.
रस्त्यावरच हा अपघात झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा पाच-सहा किलोमिटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम