वडेट्टीवार यांनी दिलाय तो कोरोना बाबत सूचक इशारा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay vadettiwar) यांनी अलीकडेच केलेलया वक्तव्यानुसार जनतेने अश्याच पद्धतीने नियम पायदळी तुडविले तर कोरोना विस्फोटक होईल आणि जानेवारी आणि एप्रिलमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होईल.

कोरोनाच्या बाबत नियम असेच पायदळी तुडविले तर गंभीर परिस्तिती निर्माण होऊ नये म्हणून लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही असे वड्डेट्टीवार म्हणाले. जनतेला नियमांचं पालन करावे असे वेळोवेळी सांगितले तरीसुद्धा नियमांचं पालन होत नाही असे दिसून येते त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे . तो कमी करण्यासाठी लॉकडाऊन कधी लावायचे याबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील.

काय चालू काय बंद आहे
दरम्यान, राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी (३१ डिसेंबर) मध्यरात्रीपासूनच निर्बंध लागू केले आहेत. यामुळे कार्यक्रमांसाठी एकत्र जमणाऱ्या लोकांची मर्यादा ५० करण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी देखील २० लोकांचं बंधन घालण्यात आलं आहे. सध्या काही मोजक्याच गोष्टींवर निर्बंध घातले असले तरी या निर्बंधांमध्ये वाढ करण्याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करत आहे. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपटगृह यांच्यावरील संभाव्य निर्बंधांवर देखील खल झाला. तसेच, गंभीर परिस्थिती उद्भवल्यास लॉकडाऊनच्या पर्यायावर देखील चर्चा झाली. तसेच संसर्ग कमी करण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार त्या त्या जिल्ह्याधिकाऱ्यांना आणि स्थानिक प्रशासनास दिले आहेत .

आजपासून काय असतील निर्बंध ?

राज्य सरकारने गुरुवारी रात्री उशिरा नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातील विवाह सोहळय़ांमध्ये फक्त ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल. सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल. ही संख्या खुल्या किंवा बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांना लागू असेल. तसेच, अंतिम विधीसाठी स्मशानभूमीत फक्त २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. चौपाट्या, पर्यटन क्षेत्रे येथे गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाने चौपाट्या, समुद्रकिनारे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

निर्बंधाची चर्चा कोणत्या घटकावर झाली
दरम्यान, यावेळी राज्यातील उपहारगृहे, मॉल्स, हॉटेल्स, शाळा याविषयी देखील बैठकीत खल झाला. उपाहारगृहांमध्ये सध्या ५० टक्क्यांच्या क्षमतेला परवानगी असली तरी बहुतांशी उपाहारगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. उपाहारगृहांची तपासणी करण्याची पुरेशी यंत्रणा देखील पोलिसांकडे नाही. त्यामुळे यावर निर्बंध आणण्याची भूमिका यावेळी पोलिसांकडून मांडण्यात आली. पण यावर अद्याप काही निर्णय झालेला नाही. मात्र निर्णय झाला तर ज्यावर निबंध लावायचेत त्याबात चर्चा झालेली आहे त्यामध्ये उपहारगृहे, मॉल्स, हॉटेल्स, शाळा इत्यांदीचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe