अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- नवीन वर्ष हा आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना व्यक्त करण्यासाठी छान काळ आहे. कल्पना करा की आपल्या प्रियजनांनी त्यांच्यासाठी त्यांच्या नावासमवेत नवीन वर्षाचे संदेश नेटवर पाहिल्यास किती आनंद होईल! तर आपण कशाची वाट पाहत आहात, आपल्या प्रियजनांसाठी गोंडस आणि खास शॉर्ट न्यू इयरचा संदेश पाठवा आणि त्यांच्यासाठी आगामी वर्ष खरोखर विशेष बनवा.(Happy New Year Wishes In Marathi)
2. नवीन वर्षात पदार्पण करताना खूप मोठे ध्येय पार करायचे आहे काहीतरी नवीन करायचे आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
3. पाहता-पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
4. नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी
5. आयुष्यातील आणखी एक अनमोल वर्ष समाप्ती, या आयुष्याच्या प्रवासात प्रवास करताना खूप काही कमावलं तर खूप गमावलं देखील आता काय कमावलं अन काय गमावलं हे शोधण्यापेक्षा नवीन काहीतरी उमेद आणि संकल्प घेऊन 2022 मध्ये प्रवेश करूया. या सरत्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. आपली साथ नेहमीसारखी माझ्याबरोबर आयुष्यभर असेल अशी आशा करतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
6. बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते. काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात. आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते. नवा बहर,नवा मोहोर. नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला, नव्या वर्षाचे स्वागत करु या.
7. डे बाय डे तुझा आनंद होवो डबल, तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल, देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट, हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.
8. आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत २०१९ मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2022 मध्ये पण तय्यार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…
9. नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.
10. माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे. WISH YOU A HAPPY NEW YEAR 2022
11. प्रत्येक वर्ष कसं
पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…! या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
12. कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही मन दुखू नये हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख. हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप.
13. इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2022! In Advance Love You भावांनो…
14. जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो, जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो. या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा
15. आनंद राहो तुझ्याजवळ, एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे, ना कधी अपयश येवो, सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी. नववर्षाभिनंदन.
16. *नमस्कार*
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
17. सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब. माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
18. झालं गेलं ते विसरून जा, नव्यावर्षाला जवळ करा. देवाकडे हीच प्रार्थना नव्या वर्षात पूर्ण व्हाव्यात तुमच्या सर्व इच्छा. हॅपी न्यू ईयर.
19. ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी, अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी. विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी
20. या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं, प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय. यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.
21. हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो, खूप प्रेमळ होता 2021 चा प्रवास, अशीच राहो 2022 मध्येही आपली साथ.
22. या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं, प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय. यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.
23. गेलेल्या दिवसासोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे, नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात. नववर्षाभिनंदन.
24. कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही. पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो. हॅपी न्यू ईयर.
25. चुकांना माफी देता येते. जर तुमच्यात त्या स्वीकारण्याचं साहस असेल तर मग चला नव्याने सुरूवात करूया. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
26. पूर्ण होवोत तुमचे सगळे एम, सदैव वाढत राहो तुमचं फेम, मिळत राहो प्रेम आणि मैत्री व मिळो लॉट ऑफ फन आणि मस्ती,विश यू ए हॅपी न्यू ईयर.
27. येणारं हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना चांगलं जावो. ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो. याच शुभेच्छा संदेशाने करतो तुला नववर्षाभिनंदन.
28. तुम्ही जिथे जाल तिथे करा फ्लाय ऑल टियर. सर्व लोकांचे व्हा तुम्ही डिअर, तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लियर आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू ईयर.
29. “जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
सन 2022 साठी हार्दीक शुभेच्छा…!
30. येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम