अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- नवीन वर्षांची (Happy New Year) सुरुवात होत असताना अनेक जण मोठाल्या पार्ट्यांचं आयोजन करतात , पार्ट्यामध्ये अंमली पदार्थाबरोबरच दारूचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. अनेक तरुण या अश्या पार्ट्याच्या माध्यमातून दारूच्या आहारी जातात.
हि तरुण मुले दारूच्या आहारी जाऊ नयेत म्हणून . पुण्यातील (Pune) आनंदवन व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून हि जनजागृती केली जात आहे. अश्या पद्धतीने हि जनजागृती गेल्या १० वर्षांपासून केली जात आहे.
जनजागृती अभियानातील घोषणा.
दारू नको दूध प्या
मानवतेचा ढोस घ्या
घरांघरात हा संदेश पोहचवण्याचा संस्थेचा उद्देश आहे. यामुळे चांगल्या समाजाची निर्मिती होईल असा संस्थेला विश्वास आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम