अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- महागाईच्या भडक्याने होरपळलेल्या जनतेसाठी नववर्षाच्या सुरुवातीला एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.(LPG cylinder)
त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान डिसेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
मात्र, त्यावेळी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही ही जनतेसाठी दिलासादायक बाब होती. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात झाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत
दिल्ली – 2001 रुपये
कोलकाता – 2077 रुपये
मुंबई – 1951 रुपये घरगुती सिलिंडर दर जैसे थे…
दिल्ली – 899.50 रुपये (विनाअनुदानित 14.2 किलो)
मुंबई – 899.50 रुपये (विनाअनुदानित 14.2 किलो)
कोलकाता – 926 रुपये (विनाअनुदानित 14.2 किलो)
चेन्नई – 915.50 रुपये (विनाअनुदानित 14.2 किलो)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम