अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या विकृत व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटकमध्ये ही घटना घडली असून हा व्यक्ती आता पोलिसांचा ताब्यात आहे.?(Annoyingly Libran)
मुख्य म्हणजे या विकृत व्यक्तीला त्याने केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नाहीये. आरोपी देवदास देसाई याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, येशूचा संदेश देण्यासाठी हे करत असून या कृत्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही.’
जवळपास वर्षभरापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. हा व्यक्ती मंदिराच्या आवारातून बाहेर पडायचा आणि वापरलेले कंडोम दानपेटीत टाकायचा.
पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, 62 वर्षीय आरोपी देवदास देसाईने मंगळुरूच्या अनेक मंदिरांमध्ये हे कृत्य केलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते.
मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान गेल्यावर्षी 27 डिसेंबर रोजी कोरजना कट्टे गावातील एका मंदिराच्या दानपेटीत वापरलेला कंडोम मिळाल्याची माहिती होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम