अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- जगाला पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या नव्या लाटेने त्रस्त केले आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संक्रमणामुळे बचावाच्या मार्गांचीही नव्याने चर्चा होत आहे.(corona varient-omicron)
जगभरातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फेस मास्क परिधान करणे हाच सर्वात परिणामकारक बाह्य उपाय आहे. मात्र, कापडी मास्क याबाबत सुरक्षित नाही. कापडी मास्क सूक्ष्म कणांना शरीरात जाण्यापासून रोखू शकत नाहीत. त्यांच्यामधून अगदी मोठे ड्रॉपलेटस्ही आरपार जाऊ शकतात.
‘अमेरिकन कॉन्फरन्स ऑफ गव्हर्न्मेंटल इंडस्ट्रियल हायजिनिस्ट’मधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कापडी मास्कमध्ये 75 टक्के लिकेज असते. कापडाचे जाड मास्कही मेडिकल ग्रेड मास्कच्या तुलनेत परिणामकारक ठरत नाहीत. अमेरिकन हेल्थ एजन्सी ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ (सीडीसी) नुसार ‘एन 95’ मास्क हा कोरोनापासून 95 टक्के तर डिस्पोजेबल मास्क 85 टक्क्यांपर्यंत संरक्षण देऊ शकतो.
तज्ज्ञांनी सांगितले की, कापडी मास्क हे केवळ चेहऱ्याची शोभा वाढवण्याचेच काम करतात, त्यांचा दुसरा कोणताही उपयोग नाही. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या स्थितीत असे मास्क कुचकामी आहेत. लोकांनी किमान थ्री लेअर सर्जिकल मास्क परिधान करावा.
त्यांनाच ‘डिस्पोजेबल मास्क’ही म्हटले जाते. असे मास्क बाजारात सहज उपलब्ध होतात. कापडी मास्कबरोबरही तो परिधान केला जाऊ शकतो.
अतिशय गर्दी असलेल्या ठिकाणी ‘एन 95’ किंवा ‘के 95’ मास्क लावणे गरजेचे आहे. त्यांची सामग्री सूक्ष्म कणांना आपले नाक आणि तोंडात जाण्यापासून रोखते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम