अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात सध्या भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून रोज कोणत्या ना कोणत्या भागात ते आपली करामत दाखवत आहेत.(Ahmednagar Crime)
आता तर शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची अवजारे देखील चोरीच्या घटना घडत असतानाच शेतात काम करत असताना यावेळी बांधावर लावलेली मोटारसायकलच चोरून नेल्याची घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील शेतकरी पोपट एकनाथ गमे हे शेतातील काही काम करण्यासाठी त्यांच्या शेतात गेले होते.
दरम्यान त्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर हिरो होंडा कंपनीची ड्रीम युगा (एमएच १६ सीबी ०३९५) या क्रमांकाची मोटारसायकल उभी केली होती.
परंतु अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत गमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास पोना.आंधळे हे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम