अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळला मृतदेह !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या छोट्या पुलाखाली गोदावरी नदीच्या पाणी पात्रात रविवारी 2 जानेवारी रोजी सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह मिळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी सकाळी मॉर्निंग वॊकसाठी आलेल्या नागरिकांना पुलाखाली मृतदेह असल्याचे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना सदरची माहिती दिली.

पोलीस निरीक्षक देसले यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक भरतदाते,पो हे कॉ ढाकणे,कांबळे,पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे यांना घटनास्थळी पाठवले,पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून अमित खोकले यांच्या रुग्णावाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

सदर मृतदेहाची ओळख पटली नसून सदर इसमाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असावे तसेच त्याने निळ्या रंगाची पॅन्ट आणि लाल रंगाचा टि शर्ट घातलेला आहे. सदर पुरुषाला कोणी ओळखत असल्यास कोपरगाव शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

दरम्यान सदर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी भाऊसाहेब पंदोरे,विकि जोशी,दीपक कराळे, अन्सार शेख,आदी नागरिकांनी पोलिसांना मदत केली.मृतदेह बाहेर काढताना नागरिकांनी पुलावर मोठी गर्दी केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe