अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः खा.विखे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.(MP Sujay Vikhe)
माजी मंत्री तथा राहता विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली असताना त्यांचे सुपुत्र खा. सुजय विखे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
फेसबुक पोस्ट मध्ये खा.विखे यांनी म्हंटले आहे. काळजी करण्याचे कारण नाही परंतु खबरदारी म्हणून मी स्वतः विलगिकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची टेस्ट करावी व काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम