अहमदनगर ब्रेकींग: दोन एटीएम फोडले; पोलिसांसह फिंगर प्रिंट, डॉग स्काॅड पथक घटनास्थळी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  शहरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र हे दोन एटीएम चोरट्यांनी आज पहाटे फोडले.(Ahmednagar Crime News)

यामधून किती रक्कम चोरीला गेली याची माहिती अद्याप समोर आली नसून तोफखाना पोलीस व फिंगर प्रिंट, डॉग स्काॅड पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बॅंकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जिल्ह्यात एटीएम फोडीच्या घटना सर्रास सुरू आहे. आज सोमवारी पहाटे चोरट्यांनी पाईपलाईन रोडवर बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने फोडले.

एटीएम फोडण्यापूर्वी चोरांनी एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला कलर स्प्रे मारला होता. सकाळी काही स्थानिकांनी याबाबतची माहिती तोफखाना पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News