सावित्रीबाईंची क्रांतीकारी प्रेरणा आजही देशास प्रेरक

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- तत्कालीन परिस्थितीत प्रचलित समाज व्यवस्थेचा विरोध पत्कारुन स्त्री शिक्षणासाठी आपला निर्धार पक्का करुन लढलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान आजही देशास प्रेरक असल्याचे उद्गार अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांनी काढले.

जिल्हा वाचनालयात ‘सावित्री उत्सवा’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनंत देसाई, प्रा.ज्योती कुलकर्णी, किरण आगरवाल, कवी चंद्रकांत पालवे, गणेश अष्टेकर, नंदकुमार आढाव, ग्रंथपाल अमोल इथापे, सहा.ग्रंथपाल नितीन भारताल उपस्थित होते.

प्रा.ज्योती कुलकर्णी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलतांना प्रा.कुलकर्णी यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्योत्तर काळात असंख्य स्त्री कार्यकर्त्या, लेखिका उदयास आल्या.

पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीयांना अधिकाराची जाणिव करुन देणार्‍या सावित्रीबाईंचे कार्य प्रेरक असल्याचे सांगितले. कवी चंद्रकांत पालवे यांनी यावेळी बोलतांना ‘सावित्रीबाईंची प्रेरणा आजही नव्या पिढीला क्रांतीकारी अशी आहे’, स्त्री शिक्षणाच्या सक्षमीकरण भारताच्या सर्वच क्षेत्रात स्त्रीयांनी मिळविलेले यश हे सावित्रीबाईंच्या कार्याचे फलित असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक उपाध्यक्ष अनंत देसाई यांनी केले तर आभार गणेश अष्टेकर यांनी मानले. याप्रसंगी निर्गम सहाय्यक पल्लवी कुक्कडवाल, वर्षा जोशी, अलका घबाडे,

संजय गाडेकर, कुमार गुंटला, संकेत फाटक, विठ्ठल शहापुरकर उपस्थित होते. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe