वर्षभरात चोरटयांनी जिल्ह्यातील 21 एटीएम फोडून 31 हजारांची रोकड लांबवली

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या घटनांमुळे पोलीस प्रशासन देखील चक्रावून गेले आहे. यातच नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात कमालीची एटीएम फोडीच्या घटना घडल्या आहेत.

याबाबतची आकडेवारी देखील धक्कादायक आहे. गेल्या वर्षभरात चोरट्यांच्या टोळ्यांनी 21 एटीएम मशीन फोडले. यातील सात एटीएम मशीनमधून 31 लाख 20 हजारांची रक्कम लांबविली.

तर 14 ठिकाणच्या एटीएममधून चोरट्यांना रक्कम काढता आली नाही. एटीएम मशीन फोडणार्‍या तीन प्रकारच्या टोळ्या जिल्ह्यात सक्रीय आहेत.

यामध्ये गॅस कटर, जिलेटीनचा स्फोट उडवून तसेच एटीएम मशीन वाहनाला बांधून ओढून नेणार्‍या टोळ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील लोणी, संगमनेर शहर, संगमनेर तालुका, पारनेर,

कोतवाली, नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सात एटीएम मशीन फोडून त्यातील 31 लाख 20 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली आहे.

दरम्यान एटीएम फोडीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आतापर्यंत फक्त पाच गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

तर दुसरीकडे बँकांकडून एटीएम मशीन सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यात एटीएम मशीन फोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

एटीएमच्या ठिकाणी या गोष्टी आवश्यक

एटीएममशीनच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करणे

एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज थेट बँकेच्या मुख्यालयात डीव्हीआर मध्ये स्टोरेज करणे

छेडछाड झाल्यास आलाराम सिस्टीम कार्यान्वित करणे

सुरक्षा रक्षक नियुक्तीस विलंब होत असल्यास रात्रीच्या वेळी एटीएममध्ये रोकड न ठेवणे

एटीएम मशीन कायमस्वरूपी मजबूत इमारतीमध्ये बसविण्याचे काम बँकांनी करणे

दरम्यान आजही नगर जिल्ह्यातील अनेक बँकांच्या एटीएम मशीनची सुरक्षा सध्यातरी रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून आले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe