सुदैवाने ‘त्या’कठड्याला धडकून कार थांबली अन्यथा…. एकाच कुटुंबातील चौघे जखमी: ‘या’ अवघड घाटात झाला हा अपघात

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-   दोन दिवसांपासुन जिल्ह्यातील विविध ठिकाणी अपघातघडत असून त्यात काहीचा मृत्यू देखिल झाला आहे. काल नगरहून शेवगावकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला करंजी घाटात अपघात होऊन एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत.

ही घटना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी तात्काळ मदत केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, नगरहून निघालेली स्विफ्ट कार करंजीघाट उतरत असताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला अन रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्याला धडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले.

मात्र सुदैवाने संरक्षणकठड्यामुळे कार समोरील ५० फूट खोल दरीत कोसळण्यापासुन बचावली.

या धडकेमध्ये मच्छिंद्र श्रीपती कोहळ, सविता मच्छिंद्र कोहळ, रुपाली मच्छिंद्र कोहळ , श्रीकांत मच्छिंद्र कोहळ असे पती, पत्नी, मुलगी व मुलगा जखमी झाले आहेत.

यातील मच्छिंद्र व सविता कोहळ हे गंभीर जखमी झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe