‘त्या’तरुणाच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिस कोठडी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- मोटारसायकलचा कट लागल्याच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून करून पसार झालेल्या मुख्य आरोपीसह इतर तीनही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता.

कोर्टाने या खुनातील मुख्य आरोपीस १० जानेवारीपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. राहुल रवींद्र माळी रा. कोपरगाव मोहनीराज नगर, असे कोपरगावातून अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.

राजेंद्र बबनराव भोसले (वय ३५, रा. गोपाळ वाडा संजीवनी कारखाना) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयत राजेंद्र याचा भाऊ रवींद्र भोसले (वय ३१) याने फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी राहुल माळी व त्याच्या साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी कोपरगाव आठवडे बाजारात भर दुपारी राजेंद्र भोसले याचा लोखंडी रॉड गज फावडयाचा दांडा याने वार करून, तसेच दगडाने ठेचून खून करण्यात आला होता.

या प्रकरणातील तीन फरारी आरोपी मटकी कानडे (पूर्ण नाव कळू शकले नाही)रा.लिंबारा मैदान कोपरगाव, गफुर अब्दुलगणी बागवान रा. लिंबारा मैदान, कोपरगाव,राहुल गणेश मगर रा. गोरोबानगर, कोपरगाव यांना अटक करण्यात आली.

राजेंद्र भोसले यांचा खून झाल्याचे समजताच सोमवारी सायंकाळी गोपाळ वाड्यातून शे-दोनशे तरुणांचा घोळका कोपरगाव शहरात आला.त्यांनी आरोपीला अटक करा,अशी मागणी केली.

या संतप्त जमावाने संत जनार्दन स्वामी या दवाखान्याचे व रुग्णवाहिकेचे काचा फोडून नुकसान केले. काही वेळ साई तपोभूमी चौकात रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला परंतु पोलिसांनी आरोपींना अटक केल्यामुळे जमाव शांत झाला.आता तणाव निवळल्याने परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe