अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे राज्य पुन्हा एकदा कठोर निर्बंधाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. यातच अनेक ठिकाणी शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या आहेत.
दरम्यान राज्यातील पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात पहिली ते पाचवी पर्यंत सर्व माध्यमांच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद राहणार आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी कऱण्यात आले आहेत. कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान, शाळांचे ऑफलाईन वर्ग जरी बंद राहणार असेल, तरी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथं ऑनलाईन शाळा सुरु राहणार आहेत. फक्त ऑफलाईन वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत.
त्यामुळे शाळांनी त्याप्रमाणे नियोजन करावं, असं आवाहन करण्यात येतं आहे. जाणून घ्या शाळा कुठे कुठे बंद राहणार? वसई-विरार शहर महानगर पालिका, पालघर आणि डहाणू नगर परिषद, कुडूस ग्रामपंचायत, बोईसर,
सरावली, खैरापाडा, कुंभवी, पाम सालवड, पास्थळ, बेटे गाव, नवापूर कोलवडे, मान, या सर्व ग्राम पंचायतीच्या हद्दीतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद राहतील,
असे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी काढले आहेत. दरम्यान वाढत्या कोरोनामुळे मुंबईसह ठाणे, पुणे, नवी मुंबई, पनवेल पाठोपाठ अनेक जिल्ह्यांत खबरादारीचे निर्णय घेतला जात आहे.
किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ओमिक्रॉनच्या रुग्णवाढीची गती पाहता, लहानग्यांनामध्ये संसर्ग पसरु नये, यासाठी आता पालघर जिल्ह्यातही शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम