अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर रॅली रद्द झाल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची चर्चा आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़.
या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर आज पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधल्याचे दिसून आले.
“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एका वर्षाहून अधिक काळ बसून होते, परंतु आता पंतप्रधानांना केवळ १५ मिनिटं थांबावं लागलं तर त्यांना त्रास होऊ लागला.
” असे सिद्धू म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना सिद्धू यांनी आरोप केला की, “मोदीजी, तुम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांच्याकडे जे होतं तेही तुम्ही काढून घेतलं.”
नेमके काय घडले ‘त्या’ दिवशी… भटिंडा विमानतळावरून रस्त्याने फिरोजपूरला जात असताना शेतकऱ्यांची निदर्शने सुरू होती.
त्यामुळे पीएम मोदींचा ताफा 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून पडला होता. यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परतला.
या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम