अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- जिल्ह्यातील विविध सहकारी सेवा सोसायट्या या शेतकरी व सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत.कारण केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे काम याच सेवा सोसायटीमार्फत केले जाते.
असे मत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले. नगर तालुक्यातील उक्कडगाव सेवा सोसायटी व राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे सेवा सोसायटी वर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाचे उमेदवार निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की,सेवा सोसायटी यांच्यामार्फत जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जाच्या रूपाने अर्थसहाय्य केले जाते. कमी व्याजदरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्यास मदत होत असते.असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम