आरोग्यमंत्रीनी दिला धोक्याचा इशारा ! कोरोनाची तिसऱ्या लाटेकडे वाटचाल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून, गुरुवारी रुग्णसंख्येने ३६ हजारांचा टप्पा गाठला आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता आपली तिसऱ्या लाटेकडे वाटचाल चालली असल्याचा अंदाज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. टोपे हे जालना येथे बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या अतिवेगाणे वाढत चालली असून, यासाठी पुन्हा एकदा राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. तसेच नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन केले.

मास्क नसेल तर दंड करा, पण गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले जातील. याशिवाय निर्बंध कडक करावे लागतील, असा ईशारा देखील टोपे यांनी दिला आहे. करोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही.

ज्यावेळेत लोकांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही त्यावेळेत निर्बंध आणता येईल का याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जाणार असून, मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. आता लागू केलेल्या निर्बंधाचे पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असा इशारा टोपे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाल्याचं टोपे यांनी मान्य केलं असून, चर्चा होत असतात मात्र अंतिम निर्णय हे मुख्यमंत्रीच घेतात,

असे बोलत असताना टोपे यांनी पुढे सांगितले की, धारावीमध्ये १ हजार रुपयात लस घेतलयाच प्रमाणपत्र देणारी टोळी पकडली त्यांच्यावर सरकारकडून सक्त कारवाई केली जाणार आहे. दरम्यान राज्यात लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

तसेच १० तारखेनंतर बुस्टर डोस घ्यावा या महामारीतुन नागरिकांना फकत लस वाचवेल, असं अवाहन त्यांनी केलं आहे. लसीकरणामुळे कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असून पूर्वीपेक्षा कमी रुग्ण संख्या आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe