भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी आणखी 2 कोटी मंजूर

 

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- नगर शहरतील ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखला जाणारा भुईकोट किल्ल्याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

पहिल्या टप्प्यात सुमारे ९० लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. या ऐतिहासिक भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांचा निधी आतापर्यंत प्राप्त झाला आहे.

तसेच भुईकोट किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे. याच बरोबर पर्यटनास देखील पुढे चालून जास्तीत जास्त चालना मिळणार आहे.

यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी आता २ कोटी रूपयांचा दुसरा हप्ता प्राप्त झाला असून सरकारकडून मिळालेल्या या निधीमुळे लवकरच किल्ला सुशोभीकरणाला वेग येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भुईकोट किल्ल्याचा विकास प्रगतगतीने व्हावा हाच मानस डोळ्यासमोर ठेवून शासनाकडे पाठपुरावा केला. विकासासाठी टप्प्या टण्याने निधी प्राप्त होत असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.