कोरोनावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची मात, कोरोना नियमाचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोनावर मात करत पुन्हा एकदा दौऱ्याला सुरुवात केली आहे. महसूलमंत्री यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी आपल्या मतदार संघामध्ये बैठक घेतली आहे.

यावेळी बोलत असताना त्यांनी नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत चालली असून तिसरी लाट आली आहे असे आपण म्हणू शकतो.

आपण गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाउनचा सामना करत आहोत. त्यामुळे आपल्याला आधीच मोठा आर्थिक फटका बसला आहे.

त्यामुळे जर पुन्हा लॉकडाउनचा सामना नसेल करायचा, तर आपल्याला तशी काळजी घ्यावी लागेल व कोरोनाच्या नियमाचे पालन करावे लागेल. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका,

आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडा, बाहेर पडताना मास्क वापर करा व सॅनिटीझ करत राहा असे आवाहन त्यांनी केले आहे.

तसेच पुढे बोलत असताना ई-पीक प्रकल्पावर प्रतिक्रिया देत बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्राचा यशस्वी ठरलेला प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारला असून हा प्रकल्प तिथे लवकरच राबविण्यात येणार आहे.

तसेच या प्रकल्पाचे नाव इ गिरदावरी ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाला आपल्या राज्यात यश मिळाले असून हा प्रकल्प संपूर्ण भारतात स्वीकारण्यात येईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe