सरपंच उपसरपंच नावाने असणऱ्या दुकानांची नावे हटवून यापुढे नावे देण्यास बंदी घालण्याची मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच नगर दक्षिण भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील अंत्रे यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना नुकतेच ईमेल द्वारे निवेदन दिले असून त्यांनी निवेदनात म्हंटले आहे की, सरपंच या पदाला कायद्याने अनन्य साधारण महत्व दिलेले असून आपण सरपंच हे गावाचे प्रथम नागरिक म्हणून समजतो.

मुंबई ग्रा.पं.अधिनियम १९५८/५९ च्या कलम ३० नुसार संविधनीक असणार्या सरपंच उपसरपंच पदाची नावे अनेक व्यावसाईक आजकाल जाहिरात म्हणून कापड दुकान,बार,रेस्टॉरंट,चहाची हॉटेल तसेच अन्य आस्थापनांना सर्रासपणे देत आहे.

या अत्यंत महत्वाच्या पदाची नावे दिली असताना सदर व्यावसाईकांनी फूड लायसन्स,शॉप ॲक्ट लायसन्स,परमिट रूम आदी परवानगी घेतलेली असेलच सदर परवाने देताना संबधित विभागानेही किवा अधिकार्यांनी अशा नावांच्या दुकानांना परवानगी दिलीच कशी जर अशा प्रकारे परवानगी दिल्या असेल तर त्या नेमक्या कोणी दिलेल्या आहेत याबाबत चौकशी करावी.

रस्त्याने चालताना अशा प्रकारचे नावे हॉटेल,ढाबा व अन्य ठिकाणी वाचून अक्षरशः चीड निर्माण होते. ,या संविधानिक पदाच्या नावांचा अशा प्रकारे दुरुपयोग अपमान होत असून याबाबत आपण गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तर भविष्यात अनेक अस्थापना,बार,अथवा हॉटेलांना मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, गृहमंत्री,किंवा आयुक्त,जिल्हाधिकारी,तहसीलदार,अशा प्रकारचे महत्वाच्या पदांची नावे पाहायला मिळू शकतात.

या बाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन सदर आस्थापनांचे नावे बदलण्यासाठी अथवा काढण्यासाठी आदेश अथवा सूचना करून सदर आदेशाचे वा सूचनांचे पालन न करणार्यावर कार्यवाही करावी.

आणि या प्रकारामुळे या महत्वाच्या पदाबरोबरच आपला महाराष्ट्र अपमानित होऊ नये एवढीच माफक अपेक्षा अशा आशयाचे निवेदन कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही म्हणून मेल द्वारे श्री किरण पाटील अंत्रे यांनी दिले असून या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,

कामगार मंत्री तथा अ.नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विरोधीपक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,माजी मंत्री.आ.राधाकृष्ण विखे पाटील नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे साहेब व सहाय्यक कामगार आयुक्त यांना हि ईमेल द्वारे पाठवण्यात आल्याची माहितीही श्री अंत्रे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News