तिने पाणी गरम करण्यासाठी गॅस पेटवला अन….

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  सकाळी सात वाजेच्या सुमारास घराचे दार उघडून पाणी गरम करण्यासाठी ‘त्या’ गृहिणीने गॅसच्या शेगडीवर पाणी ठवले अन गॅस पेटवनण्यासाठी काडी ओढताच एकाच मोठा स्फोट झाला.

यात घरातील चारजण जखमी झाले. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी, बेलापुर येथील धार्मिक स्थळाच्या पाठीमागे असलेल्या गाढे गल्लीतील कर्डिले यांच्या घरात शेलार हे कुटुंब भाड्याने राहात आहे.

दरम्यान काल सकाळी सहा वाजता उठून ज्योती शेलार यांनी पाणी गरम करण्यासाठी गॅसची शेगडी पेटविली. मात्र गॅस लीक झाल्यामुळे त्यांनी काडी ओढताच एकच धमाका झाला.

अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तिव्रता इतकी होती त्यांच्या घरातील साहित्यासह छतावरील पत्रे देखील उडाले असून घराच्या वरांड्या देखील कोसळल्या आहेत.

नमश्री गंभीर जखमी झाली. स्फोटातील आगीच्या ज्वालामुळे घरातील शशीकांत अशोक शेलार (वय ४३), ज्योती अशोक शेलार (वय ३८), यश अशोक शेलार (वय १६), नमश्री अशोक शेलार (वय ८) हे चौघे जखमी झाले आहेत.

स्फोटाच्या आवाजाने परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.जखमींवर येथील प्रवरानगर येथील प्रवरा वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe