शेतकऱ्याने बिबट्याला चक्क गोठ्यात कोंडले, या ठिकाणची घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  राहुरी तालुकयातील ताहाराबाद येथील कारभारी कोंडाजी औटी यांच्या गाईच्या गोठ्यात बिबट्या शिरला. कारभारी औटी यांनी धाडस करत त्याला गोठ्यात कोंडले.

गोठ्याचा दरवाजा त्यांनी बंद केल्याने बिबट्याला बाहेर पडणे मुश्किल झाले. त्यांनी तात्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली.

वनविभागाने त्या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावला व मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. याबाबत अधिक माहिती अशी कि, कारभारी कोंडाजी औटी यांच्या गोठ्यात बिबट्या शिरला.

गोठ्यात दोन गाई होत्या. एका गाईवर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाईने त्याला प्रतिकार केल्याने बिबट्या जवळील कोंबड्याच्या खुराड्यात घुसला.

बिबट्या खुराड्यात शिरताच कोंबड्या खुराड्या बाहेर पडल्या. दरम्यान औटी यांनी तत्काळ गोठ्याचा दरवाजा बंद करून घेतला.

वनविभागाला माहिती मिळताच राहुरी वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले, घटनास्थळी तत्काळ पिंजरा लावला गेला.

रात्री उशीरा दोन वाजता बिबट्या जेरबंद करण्यात यश आले. सदर बिबट्याची मादी सहा ते सात वर्षाची असून तिला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केद्रात आज नेण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News