अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- नगर शहरातील चितळे रोड परिसरात असलेल्या दत्त बेकर्स या बेकरीला आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान नगर मनपाच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम सुरू केले आहे.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चितळे रोडवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले असून भाजीवाले रोडवर बसत असल्याने अनेक वेळा या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत असते.
सुधीर परदेशी यांची ही दत्त बेकरी आहे. याला ही आग लागली असून सदर आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतेही कारण समोर आले नाही.
घटनेची माहिती कळताच तोफखाना पोलीस स्टेशन आणि कोतवाली पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सदर बेकरीच्या आसपास मोठी नागरी वस्ती असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र आत्ता सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम