अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- देशामध्ये कोरोनानेमोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामध्येच आता धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
भारतात कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 31 लाख इतकी मोठी असू शकते असा निष्कर्ष सायन्स जर्नलने काढला आहे.
मागील वर्षी एप्रिल ते जून दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंदाजे 71 टक्के म्हणजेच तब्बल 27 लाख मृत्यू झाले, असे संशोधकांना आढळले आहे.
या अभ्यासात असे म्हटले आहे की या कालावधीत, कोरोनामुळे मृत्यूदर दुप्पट झाला होता. आपण अधिकृत आकडेवारी पाहिली तर भारतात दर दहा लाख लोकांमागे 345 मृत्यू झाले
दरम्यान भारतात कोरोनामुळं झालेल्या मृत्यूंची नोंद केलेली संख्या 4 लाख 83 हजार 178 इतकी आहे. मात्र किमान 31 लाख जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे असा निष्कर्ष सायन्स जर्नलने काढला आहे.
संशोधकांनी 10 राज्यांमधील 1 लाख 4 हजार जणांचं फोनवरून सर्वेक्षण केलं. दोन लाख सरकारी आरोग्य केंद्रे आणि नागरिक नोंदणी प्रणालींमधून झालेल्या मृत्यूंचा आकडा गोळा केला.
या अभ्यासासाठी संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाचा डेटाही घेण्यात आला होता. भारतातील कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूचे अपूर्ण प्रमाणीकरण आणि या मृत्यूंमागे इतर आजारांची कारणे दिल्याने,
खरा आकडा समोर आलेला नाही असं सायन्स जर्नलचं म्हणणं आहे. तसंच सर्वाधिक मृत्यू हे ग्रामीण भागात झाले असून, त्यांची नोंद होऊ शकलेली नाही, असंही या अभ्यासात म्हटलंय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम