अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून , रविवारी राहाता तालुक्यात एकूण सक्रिय कोविड रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. तालुक्यातील शिर्डीमध्ये रविवार दिवसभरात २६ रुग्ण आढळले आहे.
कोरोना संसर्गचा पसरण्याचा खूप जास्त वेगाने असल्याने, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील डॉ. राहुल कुंकूलोळ यांनी निरीक्षण केले असता, रॅपिड चाचण्यांत सहज निदान होत आहे, असे त्यांना आढळून आले आहे.
यावेळी तहसीलदार कुंदन हिरे यांनी चाचण्यांवर भर व लसीकरणास वेग देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती दिली आहे. यावेळी बोलताना डॉ. कुंकूलोळ म्हणाले की, बारा ते चौदा वर्षे वयोगटात देखील रुग्ण आढळत आहेत.
सध्यातरी संसर्ग फुफ्फुसापर्यंत जात नाही, ही दिलासादायक बाब आहे. प्रवरा ग्रामीण रुग्णालयात सध्या तीसहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील बहुतेकांनी लसीच्या दोन्ही डोस घेतल्या असून, त्यामुळे लक्षणे सौम्य आहेत.
यापूर्वीच्या लाटेच्या तुलनेत यावेळी संसर्ग फैलावाचा वेग अधिक असला, तरी रुग्णांत लक्षणे सौम्य आहेत. सर्दी-खोकला कमी, एक-दोन दिवस ठराविक वेळी ताप येतो. उपचारास चांगला प्रतिसाद मिळतो आणि रुग्ण तीन ते चार दिवसांत बरा होतो.
एका सहासष्ट वर्षीय रुग्णाने उपचारास दाखल होण्यास उशिर केल्याने त्याला ऑक्सिजन द्यावा लागला. त्याची प्रकृती सुधारली आह. यावेळी बोलताना तहसीलदार हिरे म्हणाले की, तालुक्यातील चौदा गावांत शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन साईसंस्थानने तातडीने कोविड रुग्णालय सुरू करणे गरजेचे आहे. तशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. कोविड लसीकरण व चाचण्यांना वेग देण्याचे नियोजन केले आहे. रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम