मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवारांकडून कोविड काळात शेकडो कोटींची लूट; सोमैय्या यांचा गंभीर आरोप

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- महापालिकामध्ये शिवसेनेची सत्ता असताना घोटाळेबाज शिवसेनेने कोविड काळात शेकडो कोटींची लूट आणि कमाई केल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केला आहे.

कोविड काळात यांनी महापालिकेची शेकडो कोटींची लूट केली आणि स्वतःची कमाई केली, तसेच या लुटीचे ट्रेनिंग देणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत, असा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे लुटण्याचे साधन असून यामध्ये महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि पक्षाचे दिग्गज नेते यांचा सर्वांचाच सहभाग आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी आपली पत्नी आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी पैसे लुटले असून,

हे पैसे लुटायचे आणि कसे पास करायचे यासाठी पवार-ठाकरे यांनी मंत्रालयात स्पेशल कार्यशाळा आयोजित केल्याचं दिसतंय. त्यामुळेच अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी आणि आता यशवंत जाधव हे सगळेच अडकलेले दिसत आहे. असे आरोप सोमैय्या यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत.

यावेळी बोलताना सोमैय्या हे म्हणाले की, यशवंत जाधवांनी १५ कोटी रुपये उदय शंकर महावार आणि पीयूष जैन या एजंटला दिले. यातील महावार हा कुप्रसिद्ध मनी लॉड्रिंग करणारा एजंट आहे.

यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर्स प्रा. लि. या बोगस कंपनीच्या खात्यात १५ कोटी रुपये ट्रान्सफर केले. प्रधान डिलर्ससह त्याचे शेअर्स घेणाऱ्या पाच कंपन्याही बोगस आहेत, असा दावा सोमैय्या यांनी केला आहे.

दरम्यान, हे १५ कोटी रुपये प्रधान डिलर्सच्या खात्यातून यशवंत जाधव यांच्या खात्यात जमा झाले. स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर त्यांनी सगळे पैसे खात्यावर जमा केले होते.

यानंतर यशवंत जाधवांनी हे पैसे युएईला पाठवले. उद्धव ठाकरेंना मानलं पाहिजे कारण हा नवीन प्रकार शिवसेनेत सुरु झाला आहे. माफिया कॉन्ट्रॅक्टरकडून त्यांना पैसे घेत आहेत. यशवंत जाधवांनी १५ कोटी रुपये दिले हे तपासात सिद्ध होत असल्याचा दावाही यावेळी सोमैय्या यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe