अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत रिटर्न फाईल न करणाऱ्या करदात्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी १९ डिसेंबरपर्यंत ३.८३ कोटीहून अधिक कर रिटर्न भरले गेले होते.
विशेष बाब म्हणजे याआधी देखील रिटर्न भरण्याची मुदत दोन वेळा वाढविण्यात आली आहे दरम्यान देशभरात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रोनचा प्रादुर्भाव वाढला आहे.
यातच या विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यातच अनेकांना रिटर्न भरणे शक्य न झाल्याने त्यांच्यासाठी दिलासादायक निर्णयझाला.
आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची नवी अंतिम तारीख १५ मार्च असेल. याआधी ही मुदत दोन वेळा वाढविण्यात आली आहे. पहिल्यांदा ३१ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आणि त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत ती वाढविण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम