अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- नागवडे सहकारी साखर कारखाण्यात झालेले घोटाळे केशवराव मगर यांनी पुराव्यानिशी दाखविल्याने आपण त्यांना मदत करण्याचे ठरविले असल्याची माहिती आ.पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, स्व.शिवाजीराव नागवडे आणि माझ्यात राजकीय मतभेद होते मात्र आम्ही कधीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले नाही.
आमचा नागवडे यांच्या खाजगी कारखान्याला विरोध नाही. आम्ही खाजगी कारखाने उभारताना लोकांकडून 10 कोटींचे शेअर्स आणि 10 कोटीचे कर्ज काढले तर तसेच आमच्या जमिनी, घर गहाण ठेवल्या आहेत.
मात्र 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या नागवडे यांनी परभणी येथे 64 कोटीचा खाजगी कारखाना तसेच कराड येथे 1 हजार टनी गुळाचा कारखान्यासारखे 6 खाजगी संस्था कश्या विकत घेतल्या याचे उत्तर नागवडे यांनी सभासदांना द्यावे पुढे बोलताना आ.पाचपुते यांनी सांगितले की, राजेंद्र नागवडे यांनी कारखान्याच्या मशनरी भंगाराच्या भावात दिल्या.
सभासदांच्या कारखान्यात असलेल्या 55 कोटींच्या ठेवी राजेंद्र नागवडे हे बिनव्याजी वापरण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम