‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह मिळणार वाढीव सेवानिवृत्ती वयाचा लाभ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  आंध्र प्रदेश सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देत खुश केले आहे. राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना 23.29 टक्के पगारवाढसह सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्त्वात कर्मचारी संघटनेच्या शिष्ट मंडळाची बैठक पार पडली. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या निर्णयाची घोषणा केली. दरम्यान एकीकडे महाराष्ट्रात एसटी कामगार आपल्या हक्कासाठी लढत असतानां त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुरु आहे.

तर दुसरीकडे आंध्र प्रदेश सरकार कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. यामुळे याचे पडसाद महाराष्टात उमटणार का? हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

दरम्यान आता आंध्र प्रदेश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह वाढीव सेवानिवृत्ती वयाचा लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना 23.29 टक्के पगारवाढ देण्यात आली आहे.

तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना 1 जुलै, 2018 पासून लाभ मिळणार आहे.

तर आर्थिक लाभ 1 एप्रिल, 2020 पासून मिळेल. विशेष म्हणजे जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 10,247 कोटी रुपये अतिरिक्त भार पडणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News