अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- निवडणूक होऊन सुमारे अडीच वर्ष पूर्ण होत असताना सुद्धा माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचीच विकास कामे अजून पूर्ण होत आहेत.
मात्र त्यांच्या कार्यकाळात मंजूर असलेली अनेकविकास कामे न करता ती जाणीवपूर्वक षडयंत्राने दाबून ठेवली जात असून, ती लवकरात लवकर सुरू व्हावीत.
त्यांनी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय तुम्ही घेऊ नये अशी जनतेची व भाजपाची मागणी असल्याची टीका भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
जामखेड तालुक्यातील पर्यटन विकास मधून २०१६-१७ मध्ये मंजूर झालेल्या कामातील दुसऱ्या टप्प्याचे पैसे मिळाले असून, हे पैसे फक्त कर्जत जामखेड तालुक्यातील पर्यटन विकासासाठी मिळालेत असेही नाही तर शासनाने महाराष्ट्रातील अनेक पर्यटन विकासातील कामाचे दुसऱ्या टप्प्याचे पैसे अदा केले आहेत.
त्यात कर्जत-जामखेड चाही सहभाग आहे, त्यामुळे लोकांची दिशाभूल करत आमदार रोहित पवार यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये असे आवाहन पोटरे यांनी केले आहे.
संबंधित तीर्थक्षेत्रांची कामे ही गेली अडीच वर्ष अपूर्ण अवस्थेत असल्याकारणाने व त्यांची बिले अडकल्याने या सर्व संबधीत ठेकेदारांनी पर्यटन विभागाकडे गेली अडीच वर्षे खेटे मारून ही अपूर्ण कामे मंजूर करून घेतली असल्याचे समजते, कारण या कामात त्यांची बिले अडकली होती.
परंतु तरीही श्रेय वादाच्या लढाईत कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी कुठेच कमी पडताना दिसत नाहीत हे आता जनतेच्या पूर्णपणे लक्षात आले असून, या भुलभुलैय्याला जनता कंटाळली असून त्यांनी आपल्या राहिलेल्या कार्यकाळात माजीमंत्री राम शिंदे यांनी मंजूर केलेली परंतु राजकीय कुरघोडीत सुरू न केलेली कामे तरी पूर्ण करावीत.
अशी जनतेची व भाजपाची माफक अपेक्षा आहे. खऱ्या अर्थाने आपल्या राजकारणाच्या “नव्या पर्वाची’ दहशत, दादागिरी, व दडपशाहीची कर्जत जामखेडच्या जनतेने कर्जत नगरपंचयात निवडणुकीत झलक पाहिली असून यामुळे नोकरदार वर्ग व सर्वसामान्य जनता भयभीत झाली असून या नव्या पर्वाला जनता नक्कीच निकालाच्या धक्क्याने त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही असे पोटरे यांनी म्हटले आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम