तलाव दुरुस्तीसाठी २ कोटींचा निधी मंजूर : राज्यमंत्री तनपुरे

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- राहुरी मतदारसंघातील व तालुक्यातील ताहाराबाद, वांबोरी, धामोरी खु., गुहा, चिंचाळे, कणगर, रामपूर, नगर तालुक्यातील बहिरवाडी व इमामपूर येथील तलावांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने २ कोटी २२ लाख ५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे,

अशी माहिती नगरविकास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. मंत्री तनपुरे म्हणाले, राहुरी तालुक्यातील शेतकाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण वरदान ठरणाऱ्या पाझर तलाव दुरुस्तीसाठी ताहाराबाद, वांबोरी, वांबोरी राऊत वस्ती, धामोरी खु., गुहा खपके वस्ती, चिंचाळे गडधे आखाडा, कणगर घाडगे वस्ती, रामपूर सरोदे वस्ती, रामपूर साबळे वस्ती.

नगर तालुक्यातील बहिरवाडी काळेवस्ती, बहिरवाडी वाकी वस्ती, इमामपूर महादेव मंदिर रस्ता, इमामपूर पालखीचा ओढा येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी एकूण २ कोटी २२ लाखांचा निधी मंजूर झालेला आहे.

राहुरी नगर तालुक्यातील तलावांचे दुरुस्तीचे कामे बऱ्याच वर्षांपासून झालेले नव्हते. या तलावांची अवस्था बिकट झाल्याने पाणी गळतीचे प्रमाणही अधिक होते.

पावसाळ्यातील पाणी साचून गळतीमुळे तलाव लवकर कोरडे पडत होते.मंत्री तनपुरे यांच्याकडे लाभधारक शेतकऱ्यांनी तलाव दुरुस्तीची मागणी केलेली होती.

या मागणीची त्यांनी दखल घेऊन मंत्री तनपुरे यांनी शासन पातळीवर पाठपुरावा करुन जलसंधारण विभागाने या तलाव दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe