जिल्ह्यात 22 कारखान्यांकडून 69 लाख टन उसाचे गाळप

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  यंदाच्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील एकूण 192 साखर कारखान्यांनी 10 जानेवारी 2022 अखेर 556.01 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 546.49 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.

दरम्यान या एकूण उत्पादनामध्ये नगर जिल्ह्यातील 14 सहकारी व 8 खाजगी अशा एकूण 22 साखर कारखान्यांनी 10 जानेवारी 2022 अखेर 68 लाख 96 हजार 528 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 64 लाख 42 हजार 085 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

हे दोन कारखाने आघाडीवर नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 5 लाख 93 हजार 975 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यामध्ये तर अंबालिका या खासगी साखर कारखान्याने 8 लाख 41 हजार 345 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून जिल्ह्यात आघाडी घेतलेली आहे.

नगर जिल्ह्यातील एकूण 68 लाख 96 हजार 528 मेट्रिक टन ऊसापैकी 14 सहकारी साखर कारखान्यांनी 46 लाख 54 हजार 870 मेट्रिक टन तर 8 खासगी साखर कारखान्यांनी 22 लाख 41 हजार 658 मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केलेले आहे.

राज्यात 192 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू असून त्यामध्ये 95 सहकारी व 97 खाजगी साखर कारखान्याचा समावेश आहे.

दिवसेंदिवस दिवस खासगी कारखान्यांची संख्या वाढत आहे. सहकारी (95) पेक्षा निम्म्याहून अधिक संख्या खाजगी (97) साखर कारखान्यांची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe