मंत्री तनपुरेंच्या प्रयत्नांना यश… पाढर तलावांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून 2 कोटींच्या निधीस मंजुरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- राहुरी मतदारसंघातील व तालुक्यातील पाढर तलावांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून 2 कोटी 22 लाख 5 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे राज्याचे नगरविकास उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

ना. तनपुरे म्हणाले, मतदार संघातील राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार्‍या पाझर तलाव दुरुस्तीचे कामे बर्‍याच वर्षापासून झालेले नव्हते.

या तलावांची अवस्था अतिशय बिकट झाल्याने पाणी गळतीचे प्रमाणही अधिक होते. पावसाळ्यातील पाणी साचून गळतीमुळे तलाव लवकर कोरडे पडत होते.

याबाबत येथील लाभधारक शेतकर्‍यांनी तलाव दुरुस्तीची मागणी मंत्री तनपुरे यांच्याकडे केली होती. या मागणीची त्यांनी दखल घेऊन शासन पातळीवर वेळोवेळी पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याला यश आले असून शासनाच्या जलसंधारण विभागाने या तलाव दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला आहे. यामुळे आता या परिसारातील शेतकर्‍यांचे क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

तसेच राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील उर्वरित पाझर तलावांची दुरुस्ती निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा चालू असून लवकरच या कामांना मंजुरी मिळण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले.