जामखेडातून सोयाबीनचे 50 कट्टे चोरणार्‍या टोळीतील तिघांना परजिल्ह्यातून अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  जामखेड पोलिसांनी सोयाबीनचे 50 कट्टे (पोते) चोरणार्‍या टोळीतील बीड येथील तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 95 हजार 580 रूपयांचे सोयाबीन जप्त केले आहे.

सदर घटना जातेगाव येथे आडत दुकानासमोर घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी बापूराव तांबे (27, कवडवाडी, महासांगवी ता. पाटोदा, जि. बीड), अण्णा भागवत कोठुळे (34, रा. जवळाला, ता. पाटोदा, जि. बीड).

झेलसिंग सरदारसिंग टाक (39, रा. पोलीस कॉलनी शेजारी, पाटोदा ता. पाटोदा, जि. बीड) यांना अटक केली आहे. तर त्यांचा साथीदार करणसिंग टाक (रा. जालना) हा फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील जातेगाव येथे 28 नोव्हेंबर 2021 रोजी फिर्यादी सुनिल भानुदास गायकवाड यांनी आपल्या आडत दुकानासमोर खरेदी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या कट्ट्यांपैकी 1 लाख 80 रूपये किंमतीचे 50 कट्टे सोयाबीन रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेले होते.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे यातील संशयित हनुमंत तांबे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबुली देत गुन्ह्यातील चोरी केलेले सोयाबीन पाटोदा येथील श्रीगणेश ट्रेडर्स या आडत दुकानदार यांना विक्री केलेचे सांगितले.

पोलिसांनी तातडीने श्रीगणेश ट्रेडर्स या आडत दुकानामधून 38 कट्टे 95,580 रूपये किंमतीचे सोयाबीन जप्त करुन त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News