अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणासह विविध उपाय योजना राबवणाऱ्या कोविड योद्ध्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. मनपाच्या आरोग्य विभागातील सुमारे १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.(AMC News)
त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमी मनुष्यबळात काम करण्याचा ताण वाढला आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट रुग्णांशी संपर्क येतो.

या यंत्रणेत स्वॅब घेणारे, डाटा एन्ट्री, ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, मनपातील १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून समजली.
त्यामुळे चिंता वाढली आहे. बाधित कर्मचाऱ्यांच्या कामाचा अतिरिक्त भार इतर कर्मचाऱ्यांवर आला आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांना
आतापर्यंत ४ लाख ४९ हजार ४८४ डोस दिले आहेत. त्यापैकी २ लाख ६४ हजार ८६० नागरिकांनी पहिला तर १ लाख ८६ हजार ४४३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम