पारनेर नागरपंचायतीवर वर्चस्व कुणाचे? 19 जानेवारीला होणार सिद्ध

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- पारनेर- नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होत आसल्याने निकालासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत असली तरी नगरपंचायतीवर कोणाचा झेंडा लागणार आणि यातून तालुक्यावर वर्चस्व कुणाचे हे 19 जानेवारीला सिद्ध होईल.

पारनेर नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होण्याच्या वर्षभर अगोदरपासून आघाडी सरकारमधील घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांमध्ये नगरपंचायतीवर वर्चस्व मिळविण्याचे आराखडे तयार करत त्याची अंमलबजावणी सुरू होती.

नगरपंचायत राष्ट्रवादीच्याच ताब्यात घ्यायची आणि पूर्ण तालुक्यात आपला एकहाती अंमल सुरू करण्याचे आामदार निलेश लंके यांचे उघड मनसुबे आहेत. तर शिवसेनेच माजी आमदार विजय औटी यांच्या ताब्यात केवळ नगरपंचायतच उरली आहे. तीही ताब्यातून गेल्यास पुढील विधानसभा लढाईसाठी त्यांना मोठी ताकद खर्च करावी लागणार आहे.

यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची झाली आहे. राष्ट्रवादी व शिवसेना आपसात लढत असताना भाजपने शहरविकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील स्थानिक मातब्बरांशी हात मिळवणी करत दोघांपुढे मोठी ताकद उभी केली आहे. यामुळे ही निवडणूक आ. लंके, माजी आ. औटी यांच्यासाठीही सोपी राहिलेली नाही.

नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत पारनेर तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. चार जागांसाठी उद्या मतदान एकूण 17 जागा असलेल्या पारनेर नगरपंचायतमध्ये 13 जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान झाले आहे.

त्यावेळी सुमारे 86.9 टक्के इतके मतदान करून 66 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद केले आहेे. ओ.बी.सी . आरक्षणामुळे यातील 4 जागांची निवडणूक पुढे ढकलली होती.

यामुळे या 13 जागांची मतमोजणी राखून ठेवण्यात आली आहे. या चार जागांसाठी उद्या (दि.18) मतदान होत आहेे . 19 जानेवारीला एकूण 17 जागांसाठीची मतमोजणी होऊन निकाल सपष्ट होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe