अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- आजही जिल्ह्यात सावकारकी चोरीछुपे जोरात सुरूच आहे. यातच अनेक जण सावकाराच्या जाचाला कंटाळून अनेक टोकाचे निर्णय घेतात. असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे.
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे व्याजासाठी सावकाराकडून सातत्याने कर्जदारास होणाऱ्या छळास कंटाळून एका कर्जदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे अण्णासाहेब निवृत्ती नवले वय ४३ यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी अण्णासाहेब नवले घरातील बाथरूममध्ये दोरीच्या सहायाने गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले.
त्यांच्या खिशात सावकाराचे कर्ज व भरलेली रक्कम व सावकाराचे नाव नमूद केलेले आहे. याबाबत मयताच्या पत्नी अशा नवले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादिने फिर्यादीत म्हंटले आहे कि, माझे पती अण्णासाहेब नवले संगमनेरमधील एका कापड दुकानात कामास होते.
त्यांनी घरगुती वापरासाठी घरी माहिती न देता संगमनेरमधील सुदाम दुधे व देवाचा मळा येथील बालकिसन या खासगी सावकाराकडून तीन वर्षापूर्वी १० टक्के व्याजदराने केवळ वीस हजार रुपये घेतले होते.
तीन वर्षात या २० हजाराचे तब्बल दीड लाख रुपये परत केले होते. मात्र आणखी व्याजाच्या हव्यासापोटी सावकाराने अण्णासाहेब यांना काही दिवसांपासून त्रास देत होते. याच जाचाला कंटाळून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम