अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- नेवासा तालुक्यात मंगळवारी करोना संक्रमितांच्या संख्येचा उद्रेक दिसून आला. तालुक्यातील 19 गावांतून 43 करोना संक्रमित आढळून आले.
एकट्या सोनईत 10 बाधित आढळले तर नेवासाफाटा (मुकिंदपूर) व घोडेगाव येथे प्रत्येकी 5 संक्रमित आढळून आले. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 6 गावांतून सर्वाधिक 19 संक्रमित आढळले असून त्यातील 10 सोनईतील आहेत.
त्याशिवाय झापवाडी येथे चौघे तर गणेशवाडीत दोघे बाधित आढळले. शिंगणापूर, वांजोळी व खेडलेपरमानंद येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला.
नेवासा तालुक्यातील 9 पैकी 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या 19 गावांमधून काल 43 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या आता 16 हजार 795 इतकी झाली आहे.
दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. तरी देखील जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम