अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाचे संकट यामुळे बळीराजा आधीच हैराण झाला आहे. नैसर्गिक संकटांवर मात करत बळीराजा आपले पिके जोपासतोय मात्र काहींना काही कारणास्तव शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे.
नुकतेच राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे अज्ञात कारणामुळे एकरभर ऊस आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकर्याचे लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील हनुमानवाडी येथील आप्पासाहेब महादु निर्मळ यांचा तोडणीस आलेला 40 गुंठे ऊस अज्ञात कारणाने जळाल्यामुळे जवळपास एक लाखाचे नुकसान झाले आहे.
दुग्ध व्यावसाय असल्याने गाईच्या चार्यासांठी हा ऊस ठेवला होता मात्र ऊस जळाल्यामुळे ऊस पिकाबरोबर पशुधनाच्या चार्याचाही प्रश्न तयार झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम