जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात कोरोनाची सेंच्युरी…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे दरदिवशी बाधितांच्या संख्येत भर पडते आहे. यातच राहाता तालुक्यात सोमवारी 113 नविन रुग्ण आढळून आले.

परवा सातव्या क्रमांकावर गेलेला राहाता तालुका करोना रुग्ण वाढीत काल तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. अधिक माहिती अशी, राहाता तालुक्याच्या ग्रामीण भागात 59 रुग्ण आढळून आले.

तर शिर्डी येथे 41, राहाता येथे 12 रुग्ण आढळले आहेत. असे शहरी भागात 53 व ग्रामीण भागात 59 व बाहेरील तालुक्यातील 1 असे एकूण 113 रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांची बाधितांची आकडेवारी पाहता तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग गंभीर आहे. तालुक्यातील ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले असेल त्यांनी लस घ्यावी, तालुक्यात लसीकरण सुरू आहे.

असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्दी न करता नागरिकांनी मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा.

सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, असे आवाहन राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे. करोना निर्बंधांंचे पालन करावे, अन्यथा कारवाईचा इशारा तहसीलदारांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe